किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.43° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=आखाडा परिषदेची घोषणा=
अयोध्या, [२२ ऑगस्ट] – महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित कुंभमेळ्याला पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल, अशी घोषणा अयोध्या येथील प्रसिद्ध हनुमाग गढी मंदिराचे मुख्य पुजारी आणि आखाडा परिषदेचे प्रमुख महंत ज्ञान दास यांनी आज केली.
कुंभमेळ्यादरम्यान होणार्या शाही स्नानाच्या तारखाही महंत ज्ञान दास यांनी जाहीर केल्या. नाशिक येथील कुंभमेळा पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल आणि २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर २०१५ रोजी गोदावरी नदीत शाही स्नान होईल, असेही ज्ञान दास यांनी सांगितले. महंत ज्ञान दास यांच्या नेतृत्वातील रामानंद समुदायाच्या उच्चाधिकारप्राप्त समितीने नाशिक येथील कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात अंतिम स्वरूप दिले आणि महाराष्ट्र सरकारने त्याप्रमाणे तयारी सुरू करावी, असा सल्लाही दिला. सुमारे महिनाभर चालणार्या या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातील साधूसंत आणि सुमारे १० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाजही ज्ञान दास यांनी व्यक्त केला.