किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=३४ आमदारांसह राज्यपालांची घेतली भेट=
देहराडून, [२८ मार्च] – उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लावल्यानंतरही माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन पुन्हा सरकार स्थापण्याचा दावा केला. यावेळी कॉंग्रेस तसेच पीडीएफ आमदारही त्यांच्यासोबत होते. आपल्याला आजही ३४ आमदारांचा पाठिंबा असल्याने विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्याची मागणीही यावेळी रावत यांनी केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रपती राजवटीविरोधात दाद मागण्यासाठी कॉंग्रेसने हायकोर्टात धाव घेतली आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण ३४ आमदारांची स्वाक्षरी असलेले पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले आहे. विधानसभेत नियमांतर्गत आपल्या सरकारने विनियोग विधेयक पारीत केल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगून त्यांनी त्यासंबंधी राज्यघटनेत असलेला परिच्छेदही उदाहरणादाखल सादर केला.
लोकनिर्वाचित विधानसभेत विनियोेग विधेयक बहुमताने आम्ही मंजूर केले असल्याने ते अधिकृत मानावे, अशी आग्रही मागणी राज्यपालांकडे करून आपण विधानसभेत बहुमत सिद्ध केले असते पण केंद्राने कट करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावली, असा आरोपही हरीश रावत यांनी केला.
हायकोर्टात धाव
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्राच्या कृतीला विरोध दर्शवण्यासाठी कॉंग्रेसने सोमवारी येथील हायकोर्टात एक याचिका सादर केली. न्या. यु. सी. ध्यानी यांच्या एकल पीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले आहे.