किमान तापमान : 28.54° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.54° से.
27.37°से. - 29.77°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती=
कोल्हापूर, [३ जानेवारी] – स्थानिक स्वराज संस्था कर अर्थातच एलबीटी रद्द करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी येथे दिली.
पूर्वीच्या कॉंगे्रस आघाडी सरकारने जकातीला पर्याय म्हणून राज्यात एलबीटी लागू केला होता. पण, व्यापार्यांनी त्याला प्रखर विरोध दर्शविला. एलबीटी रद्द करण्याबाबत आपल्याला सखोल विचार करावा लागणार आहे. ठोस पर्याय आणावा लागणार आहे. त्यादृष्टीने आपले सरकार काम करीत असून, लवकरच एलबीटी रद्द केल्याची घोषणा केली जाईल. सोबतच राज्य सरकार पथकरालाही योग्य पर्याय शोधत आहे, असे त्यांनी सांगितले.
एका मराठी वृत्तपत्राच्या हिरक महोत्सवी समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू आणि राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आधी मुख्यमंत्री यायचे आणि जायचे, त्यांच्याकडेही मागण्या होत असायच्या. पण, आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत. मला खात्री आहे की, त्यांनी जनतेला जी आश्वासने दिलेली आहेत, ती पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत.