|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:34 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.43° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

27.63°से. - 29.99°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.9°से. - 30.84°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.76°से. - 30.97°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.93°से. - 30.63°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.46°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

26.12°से. - 29.61°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » भाजपा उमेदवारांची घोषणा लवकरच

भाजपा उमेदवारांची घोषणा लवकरच

  • दिल्ली विधानसभा निवडणूक
  • भाजपाच्या प्रचारात उतरणार सिनेकलावंत

Delhi-BJPनवी दिल्ली, [४ जानेवारी] – निवडणूक आयोगाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित केल्या नसल्या तरी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आम आदमी पार्टीने आघाडी घेतली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या आपने आतापर्यंत सर्व म्हणजे ७० मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले असून, प्रचारालाही सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे तर, भाजपाने मात्र व्यूहरचनेचा भाग म्हणून आपल्या उमेदवारांची अद्याप घोषणा केली नाही. लवकरच भाजपा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. आपने गेल्या दीड महिन्यात सहा टप्प्यात आपल्या ७० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये पक्षाने २१ माजी आमदारांना पुन्हा संधी दिली आहे तर, सात जणांना उमेदवारी नाकारली आहे. आपच्या उमेदवारांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील सात जणांचा समावेश आहे. आपने २०१३ च्या निवडणुकीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या आणि अतिशय कमी मतांनी पराभूत झालेल्या ११ जणांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
मात्र २०१३ मध्ये मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या ३० उमेदवारांना आपने यावेळी उमेदवारी नाकारली आहे. यात फक्त आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांचा अपवाद करण्यात आला आहे. आपने यावेळी ३७ नव्या चेहर्‍यांना उमेदवारी दिली आहे, यात वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या आठ जणांचा समावेश आहे. आपच्या उमेदवारांमध्ये ६ महिला, ५ मुस्लिम आणि ४ शीख उमेदवारांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत आपचे उमेदवार म्हणून लढलेल्या पण पराभूत झालेल्या राखी बिर्ला, जर्नेलसिंग आणि देविंदर सेहरावत यांना आपने विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी दिली आहे. या तिघांनाही लोकसभा निवडणुकीत बर्‍यापैकी मते मिळाली होती. कॉंग्रेसच्या २४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत आठ माजी आमदारांचाही समावेश आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार १६ मतदारसंघात दुसर्‍या स्थानावर होते, त्यातील ११ जणांचा पहिल्या यादीत समावेश आहे. दिल्ली प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अरविंदरसिंग लवली आणि माजी मंत्री हारून युसुफ यांच्यासह चार माजी मंत्र्यांचाही कॉंग्रेसच्या यादीत समावेश आहे. भाजपाने मात्र आपल्या एकाही उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा केली नाही. भाजपाकडे उमेदवारी मागणार्‍यांची प्रचंड गर्दी असली तरी भाजपा आपल्या बहुतांश माजी आमदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. आपल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजपाने सर्व मतदारसंघात सर्वेक्षण केले असल्याचेही या नेत्याने सांगितले.
दिल्ली विधानसभेची निवडणूक़ भाजपाने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे, कोणत्याही स्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा निर्धार आहे, त्यामुळे उमेदवारांची निवड अतिशय काळजीपूर्वक केली जात असल्याचे या नेत्याने सांगितले. २०१३ च्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक म्हणजे ३२ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल आपला २८ तर, कॉंग्रेसला फक्त आठ जागांवर समाधान मानावे लागले होते.
लवकरच घोषणा
७० सदस्यीय दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, फेब्रुवारीच्या मध्यात ही निवडणूक होऊ शकते. मतदारांची अंतिम यादी उद्या सोमवारी जाहीर होणार आहे, असे आयोगाच्या सूत्राने सांगितले. ही विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या प्रचारात उतरणार सिनेकलावंत
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याकरिता भाजपाने सिनेकलावंत हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना आणि स्मृती इराणी यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभांवर मात करण्यासाठी भाजपाने १८ प्रमुख प्रचारकांची यादी तयार केली असून, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचाही समावेश आहे. १६ वर्षांनंतर दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी भाजपा आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. राजधानी दिल्लीत अलीकडेच झालेल्या विभागनिहाय बैठकांमध्ये भाजपाने या सिनेकलावंतांचा उपयोग करून घेतला नव्हता. कारण, त्यांचा वापर केवळ प्रचारासाठीच करण्याची आणि त्यांच्या लोकप्रियतेचा जास्तीतजास्त फायदा करून घेण्याची भाजपाची रणनीती आहे. ईशान्य दिल्लीतील भाजपा खासदार आणि भोजपुरी गायक मनोज तिवारी यांचाही या प्रचार यादीत समावेश असल्याचे सूत्राने सांगितले.

Posted by : | on : 5 Jan 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g