किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलबिकानेर, [४ जानेवारी] – एका पैशाचीही गुंतवणूक न करता जमीन खरेदी करणारे आणि नंतर त्याच जमिनीच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमविणारे कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा चांगलेच अडचणीत आले आहेत. वढेरा यांच्या कंपनीसोबत झालेले सर्वच व्यवहार रद्द करून जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश राजस्थानमधील भाजपा सरकारने दिले आहेत.
बिकानेरच्या कोलायत विभागातील ३६० हेक्टर जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातील सुमारे ७५ हेक्टर जमीन ही रॉबर्ट वढेरा यांच्या कंपनीला देण्यात आली होती. कोलायतचे जिल्हा न्याय दंडाधिकारी रणसिंह यांनी सांगितले की, या भागातील जमिनी चुकीच्या पद्धतीने आणि नियमांची पालमल्ली करून खाजगी कंपन्यांना देण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर आम्ही जमीन हस्तांतरणाचे व्यवहार रद्द केले आहेत. अनेकांनी आपण शेतकरी असल्याचे खोटे दस्तावेज सादर करून या जमिनी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर यातील काही जमिनी वढेरा यांच्या मालकीची कंपनी ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’ने खरेदी केल्या होत्या.
लष्कराच्या महाजन फोल्डच्या रेंजमध्ये येणार्या विस्थापित शेतकर्यांना ही जमीन देण्यात आल्याचे दाखवित, २००६-०७ मध्ये ३६० हेक्टर जमीन काही शेतकर्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून मिळविली होती. खरे पाहता, शेतकर्यांना १९९२ ते १९९६ या काळातच नवी जमीन देण्यात आली होती. जमीन व्यवहारात असा घोटाळा झाल्याचे २०१० मध्ये उघड आले होते. मात्र, त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती. केवळ १६ शेतकरी आणि काही अधिकार्यांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली होती.