किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.29°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, [४ मे] – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील रखडलेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ९ हजार १८७ कोटी रूपये देणार आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणार्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने मराठवाड्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पासाठी ९० टक्के निधी देण्याची मागणी केली आहे. मात्र ती मागणी अमान्य करत देशातील अपूर्ण प्रकल्पासाठी ८० हजार कोटी रूपये देऊ, त्यापैकी बहुसंख्य निधी महाराष्ट्रासाठी असेल असे आश्वासन केंद्राने राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाने ग्रस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी हा निधी अत्यंत उपयोगी ठरणारा आहे.
केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या बैठकीत हा रकमेला मान्यता देण्यात आली.
दरम्यान, ज्या भागात जास्तीत जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या भागातील कामाला विशेष प्राधान्य देणार असल्याचेही केंद्राने सांगितले आहे. तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भाागाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असेही सांगितले आहे.