किमान तापमान : 27.32° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशसॅनफ्रॅन्सिस्को, [२९ ऑक्टोबर] – कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या घातक रोगांचा आधीच इशारा देणारी काही यंत्रणा मानवी शरीरात आहे किंवा नाही याचा शोध घेणारे डिटेक्टर तयार करण्याचा प्रयत्न इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गूगलकडून केला जात आहे.
जीवन विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे एक पथक गूगल एक्स लॅब या विशेष योजनेवर सध्या काम करत आहे. या पथकातील तज्ज्ञ रक्तपेशींच्या माध्यमातून यासंबंधीचे काही संदेश मिळतात का, हे जाणून घेण्यासाठी नॅनोपार्टिकल्सची मदत घेत आहेत आणि तसे काही आढळून आल्यास पोशाखात बसविलेल्या सेन्सर्समधून तसा अहवाल प्राप्त होऊ शकेल, असा या तज्ज्ञांचा प्रयत्न आहे. हे संशोधन सध्या पहिल्याच टप्प्यात असले, तरी यासंबंधी आम्ही काही उत्साहवर्धक प्रयोग केले आहेत. त्यामुळेच हे संशोधन जोमाने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे गूगलने या संशोधनाबाबत मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
लवकर निदान झाल्यास अनेक जिवघेण्या आजारांवर यशस्वीपणे उपचार करता येण्याची शक्यता नाट्यमयरीत्या बळावते, हे सर्वश्रुतच आहे. त्यामुळे गूगलच्या या संशोधनाला यश मिळाल्यास ते खूपच फायदेशीर ठरू शकते.
अत्यंत सूक्ष्म आकाराच्या नॅनोपार्टिकल्सचे विशेष भाग गोळ्यांच्या रूपात रक्तपेशींमध्ये सोडल्यास ते कर्करोगासारख्या पेशींवर चिटकू शकतील. त्यानंतर नॅनोपार्टिकल्समध्ये निर्माण करण्यात आलेल्या चुंबकीय शक्तीच्या आधारे त्यांना जीर्ण झालेल्या साधनांवर आणून लाईट किंवा रेडिओ लहरींच्या आधारे त्याची गणना करता येऊ शकते, असे गूगलचे मत आहे. जर या संशोधनात यश आले तर, डॉक्टरांना शरीरात कोणत्याही रोगाची सुरुवात होताच ते लक्षात येऊ शकते, असे कॅलिफोर्नियास्थित तंत्रज्ञाने सांगितले. वैद्यकीय निदान क्षेत्रातील मान्यताप्राप्त कंपन्यांना या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात रस असल्यास त्या कंपन्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊ, असे गूगलचे म्हणणे आहे.
गूगल लाईफ सायन्सने आतापर्यंत केलेल्या आविष्कारांमध्ये मधूमेह असलेल्या लोकांना रक्तातील शर्करेचे प्रमाण जाणून घेण्याच्या दृष्टीने डोळ्यातील अश्रूंमध्ये असलेली ग्लुकोजची मात्रा तपासण्यासाठी विकसित कॉन्टॅक्स लेन्सेस आणि इतर काही गोष्टींचा समावेश आहे.