किमान तापमान : 28.47° से.
कमाल तापमान : 29.43° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.47° से.
27.77°से. - 29.35°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशबर्लिन, [२९ ऑक्टोबर] – डार्विनचा उत्क्रांतीवाद जगात प्रसिद्ध आहे. त्यानुसार माकडापासूनच हळूहळू उत्क्रांत होत मनुष्याची निर्मिती झाली म्हणतात. त्यातही ‘चिम्पांझी’ जातीच्या माकडाचे वैशिष्ट्य असे की त्याची व माणसाची गुणसूत्रे बर्याच प्रमाणात सारखी आहेत. त्यामुळेच कदाचित माणसाची काही वैशिष्ट्ये चिम्पांझीमध्येही पाहावयास मिळतात.
आता हेच पाहा ना. दुसर्या दिवशीचा नाश्ता कोणता असावा, त्यात कोणते पदार्थ असावेत याचे नियोजन ‘माणसाची गृहिणी’ आधीच करून ठेवते. पण, आता चिम्पांझीही दुसर्या दिवशीच्या (सकाळच्या) न्याहारीचे आदल्या दिवशीच ‘व्यवस्थापन’ करून ठेवतात, हे नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. बर्लिनच्या नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स या जर्नलमध्ये संबंधित संशोधन प्रकाशित झाले आहे. कार्लाईन जन्मात यांच्या नेतृत्वातील चमूने हे संशोधन केले आहे. यानुसार कोणता ‘ब्रेकफास्ट’ घ्यायचा, तो किती प्रमाणात घ्यायचा आणि तो कुठे घ्यायचा याचे व्यवस्थित ‘प्लॅनिंग’ चिम्पांझी आदल्या दिवशीच करून ठेवतात, हे स्पष्ट झाले आहे. अनेक दिवस चिम्पांझींच्या दिनचर्येचा सखोल अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना ही विलक्षण गोष्ट कळली. चिम्पांझीचा मेंदू अन्य जातीच्या माकडांपेक्षा अधिक परिपक्व व कार्यक्षम असतो, हे यापूर्वीच सिद्ध झाले होते. पण, या ‘सुपीक’ मेंदूचा उपयोग चिम्पांझी असासुद्धा करू शकतात, हे पाहून शास्त्रज्ञही अवाक झालेत. कुठला ‘ब्रेकफास्ट’ घ्यायचा हे एकदा चिम्पांझीनी ठरविल्यानंतर तो मिळविण्यासाठी कुठलाही धोका पत्करायची त्यांची तयारी असते, हेदेखील स्पष्ट झाले आहे. दुसर्या दिवशीचा नाश्ता मिळविण्यासाठी ते आपले ‘निवासस्थान’ संध्याकाळीच सोडतात आणि रात्रीच्या गडद अंधारात आपले खाद्य शोधतात. रात्री बिबट्या आपल्यावर हल्ला करेल याची जाणीव असूनही धोका पत्करून ते अन्नाची जुळवाजुळव करतात, हे स्पष्ट झाले आहे. खासकरून विविध प्रकारची फळे जमविण्याकडे त्यांचा कल असतो. रात्रीच्या अंधारात चिम्पांझीची आई आणि तिच्या मुलांची जंगलात अन्न गोळा करण्यासाठी सुरू असलेली धावपळ आणि अगदी सकाळी आपल्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी होणारी धडपड यातील आगळावेगळा थरार पाहण्यासारखा असतो, असे कार्लाईन जन्मात यांनी नमूद केले आहे. यातील एक पंचमांश चिम्पांझी सूर्यादयापूर्वीच गंतव्य स्थानी पोहोचतात, तर त्यांचे अर्ध्याहून अधिक ‘बांधव’ जंगलातच गाढ झोपलेले असतात, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जे गाढ झोपलेले असतात त्यांनी खाद्य गोळा करण्यासाठी अधिक परिश्रम केलेले असतात. त्यांना आराम मिळावा म्हणून दुसरी चमू त्यांच्यापुरती न्याहारी शिल्लक ठेवून घराकडे पळते, असे मजेदार निरीक्षणही शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. या सर्व बाबींमुळे चिम्पांझीमध्ये उत्कृष्ट ‘टीम व्यवस्थापन’ असते हे सिद्ध झाले आहे.