किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपाटणा, [६ फेब्रुवारी] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिहारमधील सत्तारूढ जदयुमध्ये उभी फूट पडणे आता अटळ आहे. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी स्वत:च पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेतल्याने जदयुमध्ये घमासान सुरू झाले आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी उद्या शनिवारी बोलावलेली जदयु विधिमंडळ पक्षाची बैठक अनधिकृत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहाचा नेता या अधिकार्याने मांझी यांनी येत्या २० तारखेला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. तर, शरद यादव यांनीही शनिवारच्या बैठकीत विधानसभेतील सर्व १११ आणि परिषदेतील ४० आमदारांनी हजर राहाण्याचे फर्मान सोडले आहे.
मांझी यांनी २० फेबु्रवारीला सायंकाळी सात वाजता आपल्या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. शरद यादव यांना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकारच नसल्याने उद्याची बैठक अनधिकृत आहे. कारण, अशा प्रकारची बैठक बोलावण्याचा अधिकार केवळ सभागृह नेत्यालाच असतो. सभागृहाचा नेता म्हणून मांझी यांनी २० तारखेला बैठक बोलावली आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
पक्षाचे फर्मान
शरद यादव यांनी बोलावलेली शनिवारची बैठक पक्षाच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विधानसभा अध्यक्षांनी अलीकडेच अपात्र ठरविलेले आठ आमदार वगळता इतर सर्वच आमदारांना या बैठकीत हजर राहाण्याचा आदेश पक्षाने जारी केला आहे. मुख्यमंत्री जीतन राम मांझी हेदेखील पक्षाचेच आमदार असल्याने त्यांनाही या आदेशाचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती विधिमंडळ कामकाज मंत्री आणि पक्षाचे मुख्य प्रतोद श्रवण कुमार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. दरम्यान, नीती आयोगाच्या रविवारी होणार्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री मांझी शनिवारी सकाळीच दिल्लीला रवाना होणार आहेत. मांझी बैठकीत हजर झाले नाही, तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार काय, असे विचारले असता, पक्ष त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतो, असे संकेत श्रवण कुमार यांनी दिले.
तिथेच जदयुचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी पत्रकारांशी बोलताना उद्या शनिवारची बैठक वैध असल्याचे सांगितले. दरम्यान, मांझी यांच्या गोटातील सूत्राच्या मते, मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल.
मांझी यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणण्यात आल्यास, ते विधानसभा विसजर्नाची शिफारस करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तिथेच, भाजपाने मात्र वेट ऍण्ड वॉचची भूमिका पार पाडण्याचे ठरविले आहे. स्थितीवर आमची बारीक नजर आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे भाजपाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.
मांझींची हकालपट्टी आत्महत्याच ठरेल
दरम्यान, जीतन राम मांझी यांची मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याचा कोणताही निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर जदयुसाठी आत्महत्याच ठरेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे वरिष्ठ मंत्री नरेंद्र सिंह यांनी जमुई येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मांझी हे दलितांचे फार मोठे नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविणे म्हणजे बिहारमधील जनतेशी विश्वासघात करणेच होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.