किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.34°से. - 30.47°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=एका डोजची किंमत १० हजार=
पुणे, [२२ सप्टेंबर] – विविध रोगांवरील लस बनविणारी प्रसिद्ध सीरम या कंपनीने डेंग्यूवर उपचारासाठी डेंग्यूवरील जैविक औषध ‘मोनोक्लोनल अँटीबडी’ तयार केले आहे. हे औषध डेंग्यूच्या चार प्रकारांवर फायदेशीर ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या औषधाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘फास्ट ट्रॅक अप्रुव्हल’ मिळविण्यासाठी कंपनी तयारी करीत आहे. सरकारकडून मान्यता मिळताच डेंग्यूच्या रुग्णांना इंजेक्शनच्या रूपात हे औषध देता येईल. औषधाच्या एका डोजची किंमत ५ ते १० हजारांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी एकच डोज पुरेसा राहणार असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.
‘सीरमने अमेरिकन कंपनी विस्तेराच्या मदतीने हे औषध तयार केले असून मान्यता मिळताच एक ते दीड वर्षात ते खुल्या बाजारात लॉंच केले जाईल,’ अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. दरम्यान, औषधनिर्मिती क्षेत्रातील सॅनोफी आणि नोवार्टीस या मोठ्या कंपन्याही येत्या ४-५ वर्षांत डेंग्यूवरील औषध बाजारपेठेत आणू शकतात.