किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=अधिकृत घोषणा आज=
मुंबई, [३ ऑक्टोबर] – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व नागपूरचे ख्यातनाम वकील शशांक मनोहर यांचा आज एकमेव अर्ज सादर झाल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड ही आता निश्चित झाली आहे. बीसीसीआयच्या उद्या रविवारी येथे होणार विशेष आमसभेत या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
जगमोहन दालमिया यांचे २० सप्टेंबर रोजी कोलकाता येथे आकस्मिक निधन झाल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त जागेवरील नव्या अध्यक्षाची निवड उद्या होणार्या विशेष आमसभेत केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार आज शनिवारी उमेदवारी अर्ज सादर करायचे होते. अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर शशांक मनोहर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
विशेष म्हणजे बंगाल क्रिकेट संघटना, नॅशनल क्रिकेट क्लब, ओडिशा क्रिकेट संघटना, झारखंड क्रिकेट संघटना, आसाम क्रिकेट संघटना आणि त्रिपुरा क्रिकेट संघटना या पूर्व विभागातील संलग्नित सहाही संघटनांनी शशांक मनोहर यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. यंदा बीसीसीआयचे अध्यक्षपद पूर्व विभागाकडे होते. दालमिया यांच्या निधनानंतर पूर्व विभागाने आधी आपल्या भागातील व्यक्तीलाच अध्यक्षपदी विराजमान करण्याबाबत विचार सुरू केला होता. नंतर घडलेल्या घडामोडींमुळे त्यांना मनोहर यांना समर्थन जाहीर करावे लागले.
उद्या शशांक मनोहर अधिकृतपणे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ हा २०१७ पर्यंत राहणार आहे. शशांक मनोहर यांनी याआधी ऑक्टोबर २००८ ते सप्टेंबर २०११ या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले होते. स्वच्छ प्रतिमा आणि कठोर प्रशासक, अशी ओळख असलेल्या शशांक मनोहर यांचे नाव बीसीसीआयचे विद्यमान सचिव अनुराग ठाकूर यांनी पुढे केले होते आणि त्याला ठाकूर-अरुण जेटली यांच्या गटाप्रमाणेच शरद पवार यांच्याही गटाचाही पाठिंबा मिळाला. आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनीही मनोहर यांच्या नावाला समर्थन जाहीर केले होते.
‘याआधी अनेक गणमान्य लोकांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले आहे आणि चांगले काम केले आहे. त्यात शशांक मनोहर यांचाही समावेश आहे. मला विश्वास आहे की शशांक मनोहर भविष्यातही चांगले काम करतील,’ अशी प्रतिक्रिया बंगाल क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करीत असलेला माजी कर्णधार सौरव गांगुली याने आज येथे बीसीसीआयच्या मुख्यालयात बोलताना व्यक्त केली.