किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=रघुवर दास यांचे मत=
रांची, [२८ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे ‘हिरो’ आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार झारखंडचा अतिशय झपाट्याने विकास करणार आहे, असे मत झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी जो पुढाकार घेतला आहे, त्याचेच अनुकरण आपण झारखंडच्या विकासाकरिता करणार आहे. मोदी हे माझ्यासाठी नायक आहेत, असे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दास यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत रांचीचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्यासाठी आपण लवकरच केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहोत, असे सांगताना ते म्हणाले की, भाजपाच्या विकास कार्यक्रमांवरच विश्वास ठेवून झारखंडवासीयांनी भाजपाच्या हातात सत्ता सोपविली आहे. मोदी यांचे ‘स्वच्छ भारत’ अभियानही आपण राज्यात प्रभावीपणे राबविणार आहोत.