किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल=कोकणातील प्रमुख पदाधिकार्यांची मुंबईत बैठक=
मुंबई, [३ मार्च] – कॉंग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण, तर मुंबई अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती केली आहे. मात्र या निवडीवर कॉंग्रेस नेते नारायण राणे नाराज आहेत. पदाधिकार्यांच्या निवडीवरुन नाराज असलेल्या राणे यांनी मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. कारण नारायण राणेंनी सिंधुदुर्गमधील प्रमुख पदाधिकार्यांना मुंबईत बोलावलं आहे. या पदाधिकार्यांसोबत राणे स्वतः बैठक घेणार आहेत.
मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची निवड करताना राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राणेंनी केला आहे. मुंबई कॉंग्रेसचा अध्यक्ष मराठी हवा होता, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे. राणे यांनी अशोक चव्हाण आणि संजय निरूपम या दोघांच्याही निवडीवर असमाधान व्यक्त केलं व कॉंग्रेसमध्ये गुणवत्तेवर पदे मिळत नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राणे यांनी येत्या दोन दिवसांत आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितल्याने राणे विरूद्ध कॉंग्रेस असा नव्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.