किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=जेटलींचे बँकांना निर्देश=
चेन्नई, [२० डिसेंबर] – राजधानी चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांत कोसळलेला पाऊस अभूतपूर्वच होता, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले असून, प्रत्येक पीडिताच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील हे सुनिश्चित करा, असे निर्देश त्यांनी बँकांना दिले आहेत.
पीडित लोकांना मदत पुरवणे हे पहिले मोठे आव्हान आहे. शहर आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत असताना माझा हा दौरा आहे. या पावसाने जे नुकसान केले त्याचा मुकाबला करणे मानवाच्या क्षमतेपलीकडचे होते. तुम्ही नैसर्गिक आपत्ती रोखू शकत नसाल तरी ते संकट आल्यानंतर चांगले जीवनमान देणे तुम्ही सुनिश्चित करू शकता, असे जेटली यांनी पीडितांना कर्ज आणि आर्थिक मदतीचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
जयललितांशी चर्चा
तामिळनाडू दौर्यावर असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची भेट घेऊन पुनर्वसन योजनांचा आढावा घेतला. परंतु, या बैठकीत संसदेत सध्या रखडलेल्या जीएसटी विधेयकावर चर्चा झाली नसल्याचे समजते. जयललिता यांनी केंद्राकडून दोन हजार कोटी रुपयांची अंतरिम मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ही भेट पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी होती आणि यावेळी जीएसटीवर चर्चा झाली नाही, असे जेटली यांनी पाऊण तास चाललेल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. जयललिता यांच्या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून ४९ संसद सदस्य आहेत, हे याठिकाणी उल्लेखनीय.