किमान तापमान : 29.67° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.93°से. - 30.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल=पंतप्रधान होण्यासाठीच कॉंगे्रसशी हातमिळवणी : अमित शाहंचा नितीशकुमारांवर हल्ला=
पाटणा, [२३ जानेवारी] – याचवर्षी विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या बिहारमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी ‘मिशन १८५’ अर्थातच १८५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. भाजपाध्यक्षांनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान होण्याची आपली व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार यांनी कॉंगे्रससोबत हातमिळवणी केली. प्रख्यात समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांच्या तत्त्वांचा हा अपमानच होता, असा स्पष्ट आरोप अमित शाह यांनी आज शुक्रवारी केला.
कर्पुरी ठाकूर यांनी आपले संपूर्ण आयुष्य मागासवर्गीयांच्या उत्थानाकरिता वेचले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कॉंगे्रसविरोधात लढा दिला. पण, त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेण्याऐवजी नितीशकुमार यांनी केवळ केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी आणि पंतप्रधान होण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कॉंगे्रसचा हात हातात घेतला. त्यामुळे कर्पुरी ठाकूर यांना श्रद्धांजली वाहाण्याचा आणि त्यांचे नावही घेण्याचा अधिकार नितीशकुमार यांना नाही, असे अमित शाह यांनी येथे एका रॅलीला संबोधित करताना सांगितले.
भाजपासोबतची १७ वर्षे जुनी मैत्री तोडण्यामागेही नितीशकुमार यांची राजकीय महत्त्वाकांक्षाच कारणीभूत होती, कॉंगे्रस पक्षाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि लालूप्रसाद यादव यांच्या जंगल राजचा मुद्दा उपस्थित करूनच भाजपा व जदयुने बिहारमधील सत्ता खेचून आणली होती. पण, नितीशकुमार यांनी याच दोन्ही पक्षांना अखेर जवळ केले, असा आरोप त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याबद्दल बिहारवासीयांचे अभिनंदन करताना, याचवर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन मोदी सरकारचे हात बळकट करा. आम्ही १८५ जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ते पूर्ण करण्यासाठी भाजपाला पुन्हा एकदा सहकार्य करा, असे आवाहन अमित शाह यांनी केले.