किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण=
मुंबई, [११ जून] – कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या आणि राजधानी नवी दिल्लीतील राज्याची शान म्हणून ओळखल्या जाणार्या महाराष्ट्र सदनाचे कंंत्राट छगन भुजबळांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या कंपन्यांना अवैध पद्धतीने देऊन वारेमाप फायदा करून, शासनाचे प्रचंड नुकसान केले. यासाठी त्यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मुलगा, पुतण्यासह एकूण १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) विशेष तपास पथकाकडून झालेल्या चौकशीत महाराष्ट्र सदन बांधकाम कंत्राट वाटपात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एसीबीने या प्रकरणात सदर गुन्हे दाखल केले आहेत. मागील तीन दिवसात भुजबळ, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या हितचिंतकांविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. ज्या जनहित याचिकेच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे, त्यात ११ प्रकरणांचा समावेश असल्याने, उर्वरीत प्रकरणांमध्येही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने भुजबळ आणि कुटुंबीय चांगलेच अडचणीत आले आहे.
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
छगन भुजबळांसह अरुण देवधर (तत्कालीन अधीक्षक अभियंता, मुंबई) माणिक शहा (तत्कालीन मुख्य अभियंता, मुंबई परिमंडळ), देवदत्त मराठे (तत्कालीन सचिव, बांधकामे), दीपक देशपांडे (तत्कालीन सचिव, बांधकामे), बिपीन संखे ( मुख्य वास्तूशास्त्रज्ञ, बांधकाम विभाग), अनिलकुमार गायकवाड (तत्कालीन कार्यकारी अभियंता)
भुजबळांना पैसे स्वीकारण्यात मदत
खाजगी विकासक छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ, कृष्णा चमणकर, प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्न चमणकर, तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी आणि त्यांच्या पत्नी गिता जोशी.
भुजबळांनी काय केले
१. एसआरएमधील झोपडपट्टी विकास आणि परिवहन विभागांच्या ताब्यातील मोकळ्या आणि अतिक्रमण रहित मौल्यवान शासकीय जमिनींचा विकास या वेगवेगळ्या बाबी असताना त्या एकत्र करून, सदर प्रकल्प विकासक मेसर्स के. एस. चमणकर एन्टरप्रायजेसला मिळेल यासाठी प्रयत्न केले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकार्यांच्या संगनमताने विकासकाच्या नफ्याबाबतचे चुकीचे, वस्तुस्थितीशी विसंगत, असे आर्थिक ताळे बनविले.
२. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांसोबत संगनमत करून किमती जमीन चटईक्षेत्र अत्यल्प दरात विकासाकाला उपलब्ध करून दिले. त्याबदल्यात स्वतः अध्यक्ष असलेल्या न्यासासाठी कुटुंबीयांच्या कंपन्यांच्या बँक खात्यात निधी घेतला.
३. कंत्राटाच्या मोबदल्यात घेतलेली लाच खाजगी विकासकांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगून लाभ मिळवला.