किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.05° से.
26.87°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=केजरीवाल सरकारला जोरदार झटका, बोगस पदवीचे प्रकरण भोवले=
नवी दिल्ली, [९ जून] – दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला आज मंगळवारी जबरदस्त झटका बसला. विधि विषयाची बोगस पदवी सादर करणारे केजरीवाल सरकारमधील कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना पोलिसांनी आज त्यांच्या घरातच बेड्या ठोकल्या आणि पुढील चौकशीसाठी हौज खासा पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याविरोधात भादंविच्या विविध कलमांखाली एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई म्हणजे सीएनजी फिटनेस घोटाळ्याची चौकशी करण्यापासून रोखण्यासाठी केंद्राच्या दबावतंत्राचा एक भागच असल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे.
तोमर यांनी सादर केलेली विधिशास्त्राची पदवी बोगस असल्याची खात्री पटविल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने तोमर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याच आधारावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तोमर यांच्या पदवीची सत्यता माहीत करून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक बिहारच्या तिलकामांझी विद्यापीठात गेले असता, तोमर हे या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही. शिवाय, त्यांच्या पदवीविषयीदेखील विद्यापीठाला कोणतीच माहिती नव्हती. या सर्व आधारावर तोमर यांनी बोगस पदवी सादर केली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तोमर यांच्याविरोधात भादंविच्या कलम ४२० (फसवणूक) सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभा अध्यक्षांना माहिती दिली होती
दरम्यान, तोमर हे मंत्री असल्याने त्यांना अटक करण्याबाबतची माहिती पोलिसांनी सर्वप्रथम दिल्ली विधानसभा अध्यक्षांना दिली होती. त्यानंतर ३० ते ४० पोलिसांचे पथक आज सकाळीच तोमर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांना अटक करून ठाण्यात नेले. दरम्यान, तोमर यांना अटक करण्याच्या प्रकरणाने दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते संजय सिंह आणि वरिष्ठ नेते कुमार विश्वास यांनी केंद्र सरकारवर सुडाचे राजकारण खेळण्याचा आरोप केला आहे. आप सरकारने सीएनजी फिटनेस घोटाळ्याची फाईल नव्याने उघडली असल्याने, तपास रोखण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे. तोमर यांना अटक करण्याआधी नोटीसही पाठविण्यात आली नाही, असे या नेत्यांनी म्हटले आहे. तर, दिल्ली विधानसभा अध्यक्षांनीही मंत्र्याला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचा दावा केला आहे. मोदी सरकार आम्हाला पोलिस आणि खटल्यांचा धाक दाखवत आहे. त्यांनी आम्हाला एकदा नाही, हजारदा कारागृहात पाठवले, तरी आमचा भ्रष्टाचारविरोधी लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.