किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 26.97° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.97° से.
26.87°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.85°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल=भाजपाची जळजळीत टीका, केजरीवालांच्या राजीनाम्याची कॉंगे्रसची मागणी=
नवी दिल्ली, [९ जून] – अरविंद केजरीवाल सरकारमधील विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बोगस पदवी प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आम आदमी पार्टीच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या राजकारणासाठी आज सर्वाधिक काळा दिवस ठरला आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपाने दिली. तर, कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या निवासाबाहेर आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
तोमर यांनी बोगस पदवी सादर केली असल्याची माहिती असतानाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कारवाई न करता त्यांची पाठराखण केली. राजकारण स्वच्छ करण्याच्या वल्गना करून दिल्लीच्या सत्तेवर आलेले केजरीवाल स्वत:च कलंकित मंत्री व नेत्यांचे रक्षण करीत असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले.
या प्रकरणी केंद्र सरकारने कोणतीही भूमिका पार पाडलेली नाही. जे काही सुरू आहे, ते सर्व कायद्याच्या चौकटीतच. तोमर यांच्याविरुद्ध आधीच कारवाई केली असती, तर आजचा दिवस पाहायला मिळालाच नसता. कोणत्याही मंत्र्याला अटक करण्यापूर्वी पोलिस दहावेळा विचार करीत असतात. या प्रकरणात तोमर यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी पूर्ण केल्यानंतरच त्यांना अटक करण्याचे धाडस पोलिसांनी केले आहे. दिल्लीच्या राजकारणात आज खरोखरच काळा दिवस आहे, असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले.
कॉंगे्रसच्या शेकडो नेते व कार्यकर्त्यांनीही केजरीवाल यांच्या निवासाबाहेर जोरदार आंदोलन छेडले आहे. कलंकित मंत्र्यांना पाठीशी घालणारे केजरीवाल यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी केंद्रीय विधिमंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनीही केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली आहे.