किमान तापमान : 26.65° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.71°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल=अंमलबजावणी पुढील वर्षापासून: शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती=
मुंबई, [८ जून] – दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेच फेरपरीक्षा घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जवाहर बालभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून तावडे म्हणाले की, जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी निराश न होता अंगभूत कौशल्य ओळखून पालकांच्या मदतीने पुढील दिशा ठरवावी. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. फेरपरीक्षेचा निकाल लगेचच जून महिन्यात जाहीर करण्यात येईल. यावर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत अशा प्रकारची फेरपरीक्षा घेता येईल का, याबाबत सध्या विचार सुरू असल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल चांगला लागला असून, उत्तीर्ण होणार्यांची संख्या वाढली आहे. राज्यात एकूण १४ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यभरात ११ वीच्या प्रवेशासाठी १५ लाख ६८ हजार ६६४ जागा उपलब्ध आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ ८ टक्के विद्यार्थी नापास झाले असून, या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या शाळांनी करीअर विषयक उपक्रम राबवावेत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरविता येईल, असेही तावडे यावेळी म्हणाले.