किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.23°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल=अकोल्याचा धनंजय व यशपाल राज्यात अव्वल=
पुणे, नागपूर, [८ जून] – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालात अकोल्यातील बाल शिवाजी विद्यालयाच्या धनंजय सहस्रबुद्धे व यशपाल पाकड या दोघा विद्याथ्यार्र्ंनी बाजी मारली असून, ते ९९.०४ टक्के गुण घेऊन राज्यात संयुक्तपणे प्रथम आले. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश विभागांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक राहिले. नागपूर विभागातून सोमलवार रामदासपेठच्या रूपल शर्मा आणि उन्नती मामुलकर या विद्यार्थिनींेसह पंंडित बच्छराज व्यास विद्यालयाचा ऋतुज खोबे या विद्यार्थ्याने ९८.८० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे प्रथम येण्याचा मान पटकाविला. नागपूर विभागाचा निकाल ८७.०१ टक्के तर अमरावती विभागाचा निकाल ८६.८४ टक्के लागला. धनंजय आणि यशपाल यांच्या यशाच्या निमित्ताने अकोल्यातील बाल शिवाजी विद्यालयाचे नाव राज्यभरात चर्चेला आले आहे.
आज जाहीर झालेल्या निकालानुसार राज्यातील ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी निकालात जोरदार मुसंडी मारली. कोकणचा निकाल ९६.५४ टक्के लागला असून त्याखालोखाल कोल्हापूरचा ९५.१२ टक्के निकाल लागला. पुणे ९५.१० टक्के, मुंबई, ९२.९० टक्के, नाशिक ९२.१३ टक्के, औरंगाबाद ९०.५७ टक्के, नागपूर ८७.०१ टक्के, अमरावती ८६.८४ टक्के तर लातूरचा सर्वात कमी म्हणजे ८६.३८ टक्के निकाल लागला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यंदाचा दहावीचा निकाल सर्वोत्तम ठरला आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ८८.३२ टक्के लागला होता. यंदा त्यात त्यात ३.१४ टक्क्यांची वाढ झाली. लातूर मंडळाचा निकाल ‘ढांग’ लागला आहे. परीक्षेतील उत्तीर्णांची मुलांची टक्केवारी ९०.१८ असून मुलींची टक्केवारी ९२.२४ आहे. २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. ४,७३१ शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.