किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=पृथ्वीवर संदेश पाठविण्यास सुरुवात, आता उरले केवळ ९ दिवस=
चेन्नई, [१५ सप्टेबर] – गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोडलेले मंगळयान मंगळ ग्रहावर उतरण्यास आता केवळ ९ दिवस शिल्लक राहिले आहेत. यानाला मंगळाच्या कक्षेत सुरळीतपणे प्रवेश करता यावा, यासाठी इस्रोने आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटाच्या अंतराळ केंद्रात आवश्यक ती प्रक्रिया सुरू केलेली आहे. पहिल्याच प्रयत्नात जर भारताचे मंगळयान मंगळ ग्रहावर दाखल झाले, तर असे करणारा भारत जगातील पहिलाच देश ठरणार आहे.
मंगळयानाचा ३०० पेक्षा जास्त दिवसांचा प्रवास पूर्ण झालेला आहे. येत्या २४ सप्टेंबरला हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर श्रीहरीकोटा येथील केंद्रातून यानावरील द्रवरूप इंजिन पुन्हा सुरू करण्यात येईल. प्रक्षेपणानंतर हे इंजिन ‘स्लीप मोड’ अवस्थेतच आहे. ताशी ८२ हजार किलोमीटर वेगाने हे यान मंगळाच्या दिशेने पुढे सरकत आहे. मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्याला स्थिर करण्याचे दिव्य ‘इस्रो’ला पार पाडावे लागणार आहे. मंगळयानाचे इंजिन योग्य स्थितीत आहे की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी इंजिनाची चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीच्या माध्यमातून यानाला योग्य दिशा देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’चे प्रमुख के. राधाकृष्णन् यांनी दिली. याआधी अमेरिका, रशिया व युरोपियन अंतराळ संस्थेला त्यांचे यान मंगळाच्या कक्षेत स्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले होते.
दरम्यान, मंगळ यानाने पृथ्वीवर संदेश पाठवायला प्रारंभ केला आहे. यानातील सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असून सेन्सर्सच्या सहाय्याने विविध संदेश पाठवायला त्याने सुरुवात केली आहे. यानातील २.२ मीटर उंचीच्या ऍन्टेनाच्या सहाय्याने हे संदेश पाठविले जात आहेत. यानाने आतापर्यंत २११ दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले आहे. आता केवळ ४ दशलक्ष किलोमीटर अंतर शिल्लक राहिले आहे, असे त्यांनी सांगितले.