किमान तापमान : 28.28° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.66 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.63°से. - 29.74°से.
शनिवार, 15 मार्च27.42°से. - 29.94°से.
रविवार, 16 मार्च26.88°से. - 29.16°से.
सोमवार, 17 मार्च26.74°से. - 29.04°से.
मंगळवार, 18 मार्च26.35°से. - 28.24°से.
बुधवार, 19 मार्च26.22°से. - 29.04°से.
गुरुवार, 20 मार्च=मुलाखती अर्धवट सोडून परतले हॉटेलात=
औरंगाबाद, [१५ सप्टेंबर] – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज दुपारी अस्वस्थ वाटू लागले. यामुळे मुलाखती थांबवून राज ठाकरे विश्रांतीसाठी हॉटेलात निघून गेले. यामुळे आज आणि उद्याच्या मुलाखती होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
मराठवड्यातील विधानसभेच्या ४६ जागांसाठी आज राज ठाकरे इच्छूकांच्या मुलाखती घेत होते. जालना रोडवरील सागर लॉन येथे सकाळी ९ वाजतापासून मुलाखतींना सुरुवात झाली होती. एका जागेसाठी १५ ते २० जण इच्छूक होते. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या गर्दीमुळे मात्र, ‘मनसेकडे उमेदवारच नाही,’ अशी टीका करणार्या विरोधकांना चांगलीच चपराक बसली असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत मनसेचे खातेदेखील उघडले नव्हते. अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले होते. यामुळे विधानसभेत मनसेकडे उमेदवार नाही, अशी टीका त्यांचे विरोधक करत होते. मात्र राज ठाकरे उमेदवाराच्या मुलाखती घेण्यासाठी स्वतः आल्याने कार्यकर्ते आनंदीत झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात त्यांचा हा पहिला मराठवाडा दौरा आहे. मराठवड्यात विधानसभेच्या ४६ जागा आहेत. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या ठिकाणीही मुलाखती होत आहेत. विशेष म्हणजे या मुलाखतींसाठी शिवसेना आणि भाजपचे माजी आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे मुलाखती घेण्यासाठी रविवारी दुपारीच शहरात दाखल झाले. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने मुलाखती अर्धवट टाकून त्यांना हॉटेलात परतावे लागले.