किमान तापमान : 29.22° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 6.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.71°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.26°से. - 30.15°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.44°से. - 29.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.92°से. - 29.75°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.79°से. - 29.45°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.54°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – मराठी साहित्यातील कलाकृतींना परखड भाषेची जोड देऊन साहित्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे ख्यातनाम मराठी साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना २०१४ चा सर्वात प्रतिष्ठेचा असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रसिद्ध समीक्षक डॉ. नामवरसिंह यांच्या नेतृत्वातील समितीने सुवर्णमहोत्सवी म्हणजे ५० व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी भालचंद्र नेमाडे यांची आज निवड केली. या समितीत रमाकांत रथ, नित्यानंद तिवारी, सुरजीत पातर, चंद्रकांत पाटील, सुरंजन दास, आलोक रॉय, दिनेशसिंह, दिनेश मिश्र यांचा समावेश आहे. भारतीय ज्ञानपीठचे संचालक लीलाधर मंडलोई यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे भालचंद्र नेमाडे मराठी साहित्य क्षेत्रातील चौथे साहित्यिक आहेत. याआधी ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भालचंद्र नेमाडे यांनी कादंबरी, कविता आणि समीक्षा यांची मोठी भर मराठी साहित्यात घातली. ते साहित्य क्षेत्रातील राष्ट्रवादी समीक्षक म्हणून परिचित आहेत. ज्ञानपीठ निवड समितीने त्यांना हा सन्मान जाहीर करताना कोसलापासून हिंदूपर्यंतच्या सर्व कादंबर्यातील व समीक्षा ग्रंथातील त्यांच्या साहित्यमूल्यांचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे काळाच्या कसोटीवर समीक्षा ग्रंथलेखन करताना नेमाडे ग्रामीण ते आधुनिक जीवनशैलीवर व सामाजिक विसंगतीवर गंभीरपणे पण वैज्ञानिक दृष्टीने भाष्य करतात, असा गौरव केला आहे. ते मराठी साहित्यातील तीन पिढ्यांचे वाचकप्रिय लेखक असून त्यांनी समाजाच्या दिशाप्रवर्तनाचे काम केले आहे, या शब्दात ज्ञानपीठ समितीने त्यांचा बहुमान केला आहे.
नेमाडे यांची साहित्यसंपदा
कोसला, झुल, हूल, विधार, जरिला व हिंदू या सहा कादंबर्या, दोन कवितासंग्रह, सात समीक्षाग्रंथ असा भालचंद नेमाडे यांचा साहित्यसंसार आहे. १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ कादंबरीने मराठी साहित्य क्षेत्रात खळबळ उडवली. ‘हिंदू’ या त्यांच्या समीक्षाग्रंथाने तर साहित्य क्षेत्रात इतिहास घडवला. ‘टीकास्वयंवर’ या ग्रंथासाठी नेमाडे यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल नेमाडे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.