किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=विराट कोहली सामनावीर=
मीरपूर, [२७ फेब्रुवारी] – जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानचा २७ चेंडू शिल्लक असताना पाच गड्यांनी पराभव केला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पाकवरील आपले वर्चस्व अबाधित राखले. सलग दुसर्या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई केली. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्या मोहम्मद आमिरने रोहित शर्मा (०), अजिंक्य रहाणे (०) आणि सुरेश रैना (१) हे तीन गडी बाद करून आघाडीची फळी कापून काढल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये नैराश्य पसरले होते. परंतु, विराट कोहलीने ५१ चेंडूत ७ चौकारांसह ४९ धावांची खेळी करून भारताचा विजय सुनिश्चित केला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या विराटला पायचित बाद देण्यात आले. परंतु, विराट या निर्णयावर नाराज होता. विराटनंतर हार्दिक पंड्याही शून्यावर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार धोनीने वहाबच्या गोलंदाजीत कव्हर्सला चौकार खेचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. युवराज १४ धावा काढून नाबाद राहिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने १८ धावांत ३, तर मोहम्मद सामीने १६ धावांत दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करताना पाकिस्तानचा ८३ धावांत खुर्दा केला. सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्पा व दिशेने गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षकांनी त्यांना उत्तम साथ दिली. पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. आशीष नेहरा व जसप्रित बुमराने प्रारंभी पाकला झटके दिल्यानंतर नवोदित हार्दिक पंड्याने ८ धावांत ३ गडी बाद करून पाकचे कंबरडे मोडले. पाक फलंदाजांवर एवढे दडपण होते की, रवींद्र जडेजा (२/११) व रविचंद्रन अश्विन हे फिरकीपटू अनुक्रमे १२ व १३ व्या षटकात गोलंदाजीसाठी आले.
यष्टिरक्षक सर्फराझ अहमद (२५) हा पाकिस्तानकडून दहापेक्षा जास्त धावा काढणारा एकमेव फलंदाज ठरला. पाकच्या डावात फक्त आठ चौकार लागले व ही पाकिस्तानची भारताविरुद्ध टी-२० मधील सर्वात कमी धावसंख्या आहे. विराट कोहलीने मंझूरला (१०) धावचित करून पाकच्या पडझडीत भर घातली. दहाव्या षटकात पाकची ६ बाद ४७ अशी धावसंख्या होती.
संक्षिप्त धावसंख्या : पाकिस्तान १७.३ षटकांत सर्वबाद ८३ (खुर्रम मंझूर १०, सर्फराझ अहमद २५, हार्दिक पंड्या ३-८, रवींद्र जडेजा २-११)
भारत : १५.३ षटकांत ५ बाद ८५ (विराट कोहली ४९, युवराज नाबाद १४, धोनी नाबाद ७, मोहम्मद आमिर ३-१८, मोहम्मद सामी २-१६)