किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=भाजपाला धन्यवाद=
श्रीनगर, [२६ मार्च] – पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि भाजपाचे निर्मल सिंह यांनी आज शनिवारी राजभवनात राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा आपला दावा सादर केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय अनिश्चिततेला यामुळे पूर्णविराम मिळणार आहे. राज्यात ८ जानेवारीपासून राज्यपाल राजवट लावण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरला पुन्हा भाजपा-पीडीपीचे सरकार स्थापन होत असून, युतीच्या या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद मेहबुबा मुफ्ती, तर उपमुख्यमंत्रिपद निर्मलसिंह यांच्याकडे असणार आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विनाअट समर्थन दिल्याबद्दल मेहबुबा यांनी भाजपाला धन्यवाद दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल मी समाधानी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. खातेवाटपावरून दोन पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि काश्मीरचा विकास जलदगतीने करण्यासाठी युतीच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, आमदारांच्या समर्थनाचे पत्र आपण राज्यपालांना सोपविले असल्याचे आणि खातेवाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे निर्मलसिंह यांनी स्पष्ट केले आहे.