किमान तापमान : 27.64° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.69°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल=श्वेतपत्रिका जाहीर होणार=
मुंबई, [९ मार्च] – राज्याचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प येत्या १८ मार्च रोजी सादर होणार आहे. राज्याच्या उत्पन्नाचे नवे मार्ग शोधल्याने राज्याचा हा अर्थसंकल्प वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राज्याचा अर्थसंकल्प हा ४० हजार कोटींच्या आसपास आहे.
राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आपल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला कसा न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहेत. मागील सरकारने केलेला अमाप खर्च पाहता, १८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सदर केल्यानंतर आघाडी सरकारने केलेल्या खर्चाची वस्तुस्थिती दर्शवणारी श्वेतपत्रिकाही सादर करण्यात येणार आहे.
राज्याच्या सिंचन विभागात अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे या विभागात जवळपास २१०० कोटी रुपये अखर्चिक असून जिल्हा परिषदेमध्ये जवळपास १० ते १५ कोटी रुपये अखर्चिक असल्याचे वित्त विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
सिंचनाचे २१०० कोटी अखर्चिक
राज्य सरकारने विविध विकासकामासाठी महामंडळाला दिलेला निधीही अखर्चिक असून महामंडळातील हा निधी पाहता राज्य सरकार गरीब तर महामंडळे श्रीमंत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा निधी योग्य कामासाठी खर्च करण्यावर सरकार लक्ष देणार असल्याची माहिती आहे.