किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
27.88°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.1°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल=चार वरिष्ठ नेत्यांचा आरोप, राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी होणार=
नवी दिल्ली, [१० मार्च] – योगेंद्र यादव, शांतिभूषण आणि प्रशांतभूषण यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात आम आदमी पार्टीच्या पराभवासाठी आणि अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा डागाळण्यासाठी नेटाने प्रयत्न केले होते, असा आरोप पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. दरम्यान, यादव आणि भूषण यांची आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी होणार असल्याचे चिन्ह आहे.
या दोघांचीही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आपमधील वाद आणखीच चिघळला आहे. त्यात आता या नव्या खळबळजनक आरोपाची भर पडली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, वाहतूक मंत्री गोपाल राय, पक्षाचे सरचिटणीस पंकज गुप्ता आणि संजय सिंह या चार नेत्यांनी या दोन्ही नेत्यांवरील कारवाईचे आज मंगळवारी प्रथमच जाहीरपणे समर्थन केले आहे.
या चार नेत्यांनी याबाबतचे निवेदनच जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, शांती भूषण, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी पक्षाच्या पराभवासाठी काम केले होते. त्यांनी विरोधी पक्षांना मदत केली. केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी योगेंद्र यादव माध्यमांना माहिती देत होते. पक्षाचे जे कार्यकर्ते प्रचारासाठी दिल्लीत येत होते, त्यांना रोखण्याचे कामही शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांनी केले आहे. पक्षाचा पराभव व्हायलाच हवा. कारण, पराभवामुळेच केजरीवाल जमिनीवर येणार आहेत. त्यामुळे पक्षासाठी प्रचार करू नका, मी स्वत:देखील प्रचार करणार नाही, असा संदेश ते कार्यकर्त्यांना देत होते.
दरम्यान, आपमधील वाद आता चांगलाच चिघळला असताना यादव आणि भूषण यांची आपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतूनही हकालपट्टी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या २८ मार्च रोजी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत असून, त्यात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. तिथेच आपमधून बाहेर पडलेल्या शाजिया इल्मी यांनी हे तिन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करतील, यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. केजरीवाल आणि या चौकडीविरोधात जो कोणी बोलेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जातो, हीच ‘आप’ची संस्कृती आहे, असा आरोपही त्यांनी केला.
स्वाक्षर्यांसाठी आमदारांवर बळजबरी : यादव
दरम्यान, आमच्याविरोधात आपच्या चार नेत्यांनी जे निवेदन प्रसिद्ध केले आहे, त्यावर दिल्लीतील सर्व आमदारांच्या बळजबरीने स्वाक्षर्या घेण्यात आल्या आहेत. जास्तीतजास्त नेत्यांनी आमच्याविरोधात बोलावे, यासाठी त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकरणातील कटुसत्य लवकरच समोर येईल, असा दावा योगेंद्र यादव यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्यावर आम्ही जे आरोप केले, त्यावर त्यांनी जाहीरपणे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.