किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.91°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल=खटला रद्द करण्याची राहुल गांधींची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली=
मुंबई, [१० मार्च] – महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असून, संघाच्याच एका स्वयंसेवकाने गांधीजींची हत्या केली होती, या राहुल गांधी यांच्या आरोपावरून दाखल मानहानीचा खटला रद्द करण्याची राहुल गांधी यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
न्या. एम. एल. ताहलियानी यांनी ही मागणी फेटाळून लावली. तसेच, या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी काही अवधी द्यावा, अशी मागणी करणारा अर्जही हायकोर्टाने फेटाळून लावला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी ६ मार्च २०१४ रोजी ठाण्यातील सोनाळे येथे भाषण करताना, महात्मा गांधींची हत्या रा. स्व. संघाने केली होती, असा आरोप केला होता. या वक्तव्याला आक्षेप घेत भिवंडीचे संघाचे एक स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. कुंटे यांनी आपल्या आरोपात म्हटले होते की, गांधीजींच्या हत्येत संघाचा कोणताही सहभाग नसल्याचा स्पष्ट निर्वाळा तत्कालीन कॉंग्रेस सरकारनेच दिला असताना, राहुल गांधी यांनी धादांत खोटे विधान करून रा. स्व. संघाची प्रतिमा मलीन केली आहे.
या आरोपाची दखल घेत भिवंडीच्या दंडाधिकारी कोर्टाने राहुल गांधी यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करून त्यांनी जातीने कोर्टासमोर उपस्थित राहावे, असा आदेश दिला होता. या आदेशाला राहुलने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मला कनिष्ठ कोर्टात उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी आणि माझ्याविरुद्धचा खटला रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. तो अर्ज आज न्या. ताहालियानी यांच्या न्यायालयापुढे सुनावणीस आला असता, न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज सपशेल फेटाळून लावला. राहुलच्या वकिलांनी सांगितले की, हा केवळ प्रचाराचा भाग होता. दुष्ट हेतूने राहुल गांधींविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.
सरकारी पक्षाने या युक्तिवादाला जोरदार आक्षेप घेताना सांगितले की, राहुल गांधी यांनी स्वत: उपस्थित राहून आपली बाजू मांडावी आणि आरोपाच्या पुष्ट्यर्थ खटल्याच्या वेळी पुरावे सादर करावेत.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळून लावला. सोबतच सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी काही कालावधी द्यावा, अशी परवानगी मागणारा अर्जही फेटाळून लावला.