किमान तापमान : 30° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30° से.
27.64°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल=
मुंबई, [१० मार्च] – गेल्या १५ वर्षातील आघाडी सरकारच्या काळ्याकुट्ट कारभारामुळे शेतकर्यांची ही अवस्था झाली आहे. चर्चा केली तर, ‘तुमचीच पोल खुलेल, तुम्हीच उघडे पडाल’, अशी सडकून टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चेचा समावेश कामकाज पत्रिकेत असताना, विरोधकांनी यावर चर्चेच्या मागणीसाठी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या या कृतीला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी चोख प्रत्युत्तर दिले. सकाळी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, डी. पी. सावंत, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, नसिम खान, शशिकांत शिंदे, अस्लम खान, अमीन पटेल, नितेश राणे यांच्यासह अन्य सदस्यांनी हौदात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
सभागृहाचे पुन्हा सुरू झाले तेव्हा ठरलेल्या कामकाज पत्रिकेनुसार कामकाज चालविण्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला. त्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. कामकाज पत्रिकेत दर्शविल्यानुसार सभागृहाचे काही कामकाज झाले. औचित्याचे मुद्दे, स्थगन आणि लक्षवेधी सूचना रद्द करून, २९३ च्या प्रस्तावावर चर्चा घेण्यात आली.
डॉ. संजय कुंटे यांनी हा प्रस्ताव सरकारच्या वतीने सभागृहात मांडला. शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात असताना, सर्वच राजकारण्यांनी आपल्या पोळ्या शेकण्यापेक्षा शेतकर्यांना मदत मिळाली पाहिजे, या दृष्टीने योग्य सूचना सदस्यांनी कराव्यात. अशापद्धतीची अपेक्षा डॉ. कुंटे यांनी सदर प्रस्ताव सादर करतेवेळी व्यक्त केली. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटील, कॉंग्रेचे उपगट नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, छगन भुजबळ, अर्जुन खोतकर, अशीष देशमुख आदींनी आपली मते मांडली.
विरोधक पडले तोंडघशी
सुधीर मुनगंटीवारांनी शेतकरी आत्महत्या विषयावर बोलताना सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी वेळोवेळी सभागृहात पोटतिडकीने केली. आता या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या आत्महत्यांसाठी गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, अशी मागणी जेव्हा आम्ही करीत होतो, तेव्हा आघाडी सरकारच्या गृहविभागाने अतिशय अभ्यासपूर्वक असे करता येत नसल्याचे स्पष्ट केले. नियमाने तेव्हा असे करता येणे शक्य नव्हते, तर आता हे कसे शक्य होईल. या मुनगंटीवारांनी टाकलेल्या गुगलीने विरोधक चांगलेच तोंडघशी पडले.