किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=हायकोर्टाचा नितीशकुमारांना झटका=
पाटणा, [११ फेब्रुवारी] – बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्याला १३० आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी या आमदारांना घेऊन राष्ट्रपतिभवनाकडे कूच करणारे जदयु नेते नितीशकुमार यांना पाटणा उच्च न्यायालयाने आज बुधवारी जोरदार झटका दिला. जदयु विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची झालेली निवड अमान्य करून न्यायालयाने या निवड प्रक्रियेलाच स्थगिती दिली आहे.
नितीशकुमार यांच्या निवडीला मान्यता देणार्या राज्य विधानसभेच्या प्रभारी सचिवांच्या पत्राचे कायदेशीर परिणाम काय होऊ शकतात, याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. जेणेकरून राज्यपालांच्या पुढील निर्णयावर या पत्राचा प्रभाव पडायला नको, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आणि या प्रकरणी सविस्तर सुनावणी पुढील बुधवारी करण्याचे निश्चित केले.मुख्य न्यायाधीश एल. एन. रेड्डी आणि न्या. विकास जैन यांच्या खंडपीठाने जदयु आमदार आणि मुख्यमंत्री मांझी यांचे विश्वासू राजेश्वर राज यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना नितीशकुमार यांच्या निवडीला स्थगिती दिली.
गेल्या शनिवारी मांझी यांची जदयुमधून हकालपट्टी केल्यानंतर बोलावण्यात आलेल्या जदयु विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. विधानसभेचे प्रभारी सचिव हरेराम मुखिया यांनीही त्यांच्या निवडीला मान्यता देणारे पत्र लगेच जारी केले होते. त्यानंतर लगेच नितीशकुमार यांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्यासाठी दावा सादर केला होता. त्यावर अद्याप निर्णय झाला नसतानाच, न्यायालयाने त्यांची निवडच अवैध ठरविल्याने कुमार यांच्या सत्तेच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे.
तत्पूर्वी, याचिकेवर युक्तिवाद करताना विधानसभा सचिवालयाचे वकील वाय. व्ही. गिरी म्हणाले की, हा राजकीय स्वरूपाचा मुद्दा असून, तो कायद्याच्या चौकटीतील नसल्याने याचिकेला कुठलाच अर्थ नसल्याने न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावावी. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, सचिवालयाने कुमार यांची निवड वैध ठरविण्याबाबत जे पत्र जारी केले आहे, त्याचा कायद्याच्या चौकटीत काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास आम्हाला करावाच लागणार आहे. पुढील बुधवारी आम्ही यावर सविस्तर सुनावणी करणार आहोत.
मांझीच कायम असावे : पप्पू यादव
दरम्यान, राजद खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी जीतन राम मांझी यांना आपला पाठिंबा जाहीर करतानाच, त्यांनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यात यावे, अशी भूमिका घेतली. सोबतच, मांझी यांच्या हकालपट्टीच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांची समजूत घालावी, अशी मागणीही केली.