किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=बंडखोरांनी माफी मागावी=
देहराडून, [१९ मार्च] – माझ्याकडे अजूनही बहुमत आहे आणि माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही. तथापि, मी राज्य विधानसभेत विश्वासमत हरलो, तर त्याचक्षणी मी पदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी आज शनिवारी येथे विशद केली.
आमच्याकडे ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात भाजपा जनतेची दिशाभूल करीत आहे. कारण, बहुमत केवळ माझ्याजवळ आहे आणि ते मी सिद्ध करणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांची राजभवनात भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शुक्रवारी रात्री ज्या आमदारांनी माझ्याविरोधात बंडखोरी केली, त्यातील पाच आमदारांनी माझ्याशी पुन्हा संपर्क साधला आहे. चूक सुधारण्याची आणि त्यासाठी माफी मागण्याची संधी मी त्यांना दिली आहे. त्यांनी जर माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नऊ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता
दरम्यान, रावत सरकारविरोधात बंडखोरी करणार्या कॉंगे्रसच्या नऊ आमदार अपात्र ठरविण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी शिफारस मुख्यमंत्री रावत यांनी केली असल्याची माहिती आहे.