किमान तापमान : 26.31° से.
कमाल तापमान : 26.94° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.31° से.
25.99°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.85°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल=कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अपक्ष आमदार मैदानात=
मुंबई, [१९ मार्च] – अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी शुक्रवार, २० रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत गुरुवारी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, यात अपक्ष आमदाराचा देखील समावेश आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या या निवडणुकीत अधिक रंगत निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसकडून विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेकडून नीलम गोर्हे आणि अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शुक्रवारी सभागृहात आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याची शक्यता आहे. परंतु सभागृहातील एकूण सदस्य संख्येनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २८, कॉंग्रेस २१, भाजपा १२, शिवसेना ७ आणि अपक्ष ७ अशी सदस्य संख्या आहे. परंतु भाजपाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असून, अपक्ष उमेदवारला शिवसेनेचे नेते आणि मंत्री डॉ. दीपक सावंत आणि दत्तात्रेय सावंत यांनी अनुमोदन दिल्याने, शिवसेना अपक्षाला पाठिंबा देण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तर, कॉंग्रेस आपला उमेदवार परत घेऊन, अपक्षाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.