किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 73 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
25.99°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=किसान मोर्चाचे यश=
मुंबई, [१९ मार्च] – भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश किसान मोर्चातर्फे राज्यभर भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान चालू असून, मोर्चाच्या सदस्यांनी राज्यात अडीच लाख शेतकर्यांना पक्षाचे सदस्य करून घेतले आहे. दहा लाख शेतकर्यांना पक्षाशी जोडून घेण्यासाठी मोर्चाचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.
प्रदेश किसान मोर्चाची बैठक बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झाली. त्यावेळी सदस्यता अभियानातील किसान मोर्चाच्या कामगिरीची माहिती देण्यात आली. बैठकीस प्रदेश सरचिटणीस (संघटन) रवींद्र भुसारी, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, आमदार सुनील देशमुख, मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, मकरंद कोरडे व प्रदेश सचिव आनंदराव राऊत उपस्थित होते.
सदस्यता अभियानामध्ये विशेष कामगिरी करणार्या मोर्चाच्या पदाधिकार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात मोर्चाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख (२१,००० सदस्य), सातार्याचे जिल्हाध्यक्ष विश्वास सावंत (२१,००० सदस्य), कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अन्वर जमादार (११,०००), पंडितराव पाटील (७,५०० सदस्य) आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष खंडेराव किसनराव आघाव (५,००० सदस्य) यांचा समावेश होता.
सहकारी क्षेत्रातील बँकांची ३१ मार्चपर्यंत पीककर्जाची मुदत वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात यावी. अवकाळी पावसाच्या थैमानामुळे शेतकर्यांना कर्जाची परतफेड करणे अवघड झाले आहे. त्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड केली नाही तर राज्य सरकार व केंद्र सरकारकडून प्रत्येकी ३ टक्के व्याजसवलत मिळणार नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. या बैठकीला राज्यभरातील किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.