किमान तापमान : 25.86° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24°से. - 28.53°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलबुलढाणा, [१३ जून] – विदर्भ-मराठवाडा राज्य महामार्ग विकसित करून दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी खामगाव-चिखली-जालना तसेच मलकापूर ते शिर्डी आणि अकोला ते जालना अशा तीन राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच नांदुरा व खामगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वर्धा व जालना येथे सागरी माल वाहतुकीच्या केंद्रांच्या कामांना गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
चिखली येथे अंबिका अर्बन नूतन वास्तू व धान्य गोदाम लोकार्पण सोहळ्यानिमित्त शनिवार, १३ जून रोजी झालेल्या समारंभात गडकरी बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे, अंबिका अर्बनचे अध्यक्ष ऍड. विजय कोठारी, बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, काका कोयटे व संचालक उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, शेतकर्यांच्या कापूस, ऊस, गहू व तेल बियाणांना योग्य भाव मिळत नाही. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा माल पोहोचविण्याची सुविधा नसल्याने या नगदी पिकांना योग्य भाव मिळत नाही. कापूस, कपडा, गहू, बिस्कीटे, ब्रेड, साखर, सोयाबीन, करडी व जवसाच्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. कोळशापासून खते तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, वीज, पाणी सुविधा उपलब्ध झाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ व मराठवाड्याला जोडणार्या महामार्गावर खड्डे पडल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यासाठी खामगाव-चिखली-जालना या महामार्गाचे राष्ट्रीय मार्गात रूपांतर करून येत्या सहा महिन्यात हा रस्ता सिमेंटचा होणार आहे. या शिवाय मलकापूर ते शिर्डी आणि अकोला-जालना राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता तसेच नांदुरा व खामगाव रेल्वे पूल तयार करून वर्धा व जालना येथे सामुद्रिक वाहतुकीचे केंद्र उभारण्यात येणार आहे. या मार्गावर नदीवर जलमार्ग निर्माण करून महाराष्ट्रातील पाच नद्यांवर हा जलमार्ग राहणार असल्याने दळणवळणाच्या सुविधा ग्रामीण पातळीपर्यंत पोहणार असल्याचे त्यांनी सांगितले.