किमान तापमान : 26.54° से.
कमाल तापमान : 26.84° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.34 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.84° से.
24.78°से. - 28.18°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.25°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.31°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.17°से. - 27.96°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.38°से. - 27.63°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.22°से. - 27.27°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल=सहा टक्क्यांची दरवाढ=
नवी दिल्ली, [१५ जून] – कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आश्वासनही फोल ठरले आहे. दिल्ली वीज नियामक मंडळाने (डीईआरसी) आज सोमवारपासून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ केली आहे. सोबतच, बीएसईएस यमुना आणि बीएसईएस राजधानी या कंपन्यांनीही सहा टक्के आणि टाटा पॉवरने चार टक्के इतकी दरवाढ जाहीर केली.
वीज आणि पाणी स्वस्त करण्याच्या केजरीवालांच्या आश्वासनावर विश्वास ठेवूनच दिल्लीकरांनी त्यांच्या आम आम आदमी पार्टीला प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते. पण, सत्तेत आल्यापासूनच रोज नवनव्या वादांमध्ये अडकत आलेले हे सरकार वीज कंपन्यांच्या या निर्णयामुळे संकटात सापडण्याची शक्यता आहे.
केजरीवाल एकीकडे दिल्लीकरांना वाढीव बिल न भरण्याचे आणि दुसरीकडे वीज दरवाढीच्या निर्णयावर कंपन्यांना फेरविचार करण्याचे आवाहन करीत आहे. कंपन्यांनी मात्र त्यांचे आवाहन धुडकावून लावले आहे. भाजपा आणि कॉंगे्रसनेही केजरीवाल सरकारवर हल्ला चढविताना, सर्वसामान्यांवर आणखी किती आर्थिक बोजा पडणार आहे, असा सवाल केला. डीईआरसीचे अध्यक्ष पी. डी. सुधाकर यांनी सांगितले की, वीज लवादाच्या आदेशानुसारच आम्ही वीज दर वाढविले आहेत. वीज उत्पादनाचा खर्च वाढला असल्याने तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करणे आवश्यक झाले होते.