किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 29.54° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.54° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा,
मुंबई, (५ जून) – राज्यातील आगामी सर्व निवडणुका भाजपा आणि शिवसेना एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. राज्याच्या विकासासाठी आमची युती ११ महिन्यांपासून काम करीत आहे. पुढच्या काळात सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी, विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवू आणि बहुमताने जिंकू, असे ट्विट शिंदे यांनी केले.
रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत गतीने कामे सुरू असून, अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी पंतप्रधान मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. सहकार विभागाशी संबंधित बाबींवर शाह यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजपाने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून, ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार असून, त्या बहुमताने जिंकणार असल्याचे शिंदे म्हणाले.