किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,
मुंबई, (५ जून) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी,६ जून रोजी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉल मध्ये समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे सचिव संतोषकुमार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
’छत्रपती शिवाजी महाराज’ हा आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जना जनानांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार असून माँ जिजाबाई यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळप्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पुढे सरसावला आहे. अस्मानी पातशाह्यांना टक्कर देणारा आणि स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हे महान राजे खरे नायक आहेत; हे भावी पिढीलासुद्धा कळावे ही यामागील भावना आहे असेही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.