किमान तापमान : 29.43° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.63°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१२ फेब्रुवारी ) – जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा माझ्या वडिलांनी आज जे पंतप्रधान आहेत, त्यांना वाचवले होते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या अडचणीच्या काळाची आठवण करून दिली.
ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपाची जेव्हा युती झाली, तो काळ आठवला तर, देशाच्या राजकारण आम्हाला वाळीत टाकल्यासारखे होते. कोणीही आम्हाला साथ देण्यास तयार नव्हते. हात मिळवणे तर सोडा, शेजारी येऊन बसण्याचीही कोणी हिंमत करीत नव्हता. कारण ते सांप्रदायिक आहेत. त्यावेळी जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा माझ्या वडिलांनी आज जे पंतप्रधान आहेत, त्यांना वाचवले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. ते म्हणाले होते, राजधर्माचे पालन केलेच पाहिजे. त्यांनी राजधर्माचे पालन केले असते, तर आज ते तिथे (पंतप्रधान मोदी) बसले नसते. त्यावेळी बाळासाहेबांनी पर्वा केली नाही. त्यावेळी ती काळाची गरज होती.
गोरेगाव येथे आयोजित उत्तर भारतीय मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करीत होते. ते म्हणाले, मला बाळासाहेबांचे कोणतेही एक वाक्य किंवा एक शब्दही काढून दाखवा, ज्यात ते म्हणाले आहेत, आपण हिंदू आहोत म्हणजे फक्त मराठीच, हिंदी भाषिक लोकांचा द्वेष करा. आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एक आहोत, म्हणून मुस्लिम लोकांचा द्वेष करा, ते असे कधीही म्हणाले नाही. जे आपल्या देशाच्या विरोधात आहेत, ते कुठल्याही धर्माचे असू द्या, तो हिंदूही असला तरी, देशविरोधी काम करीत असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे बाळासाहेबांचे विचार होते आणि हेच आमचे हिंदुत्व आहे. गळ्यात पट्टा घालून कुणाची तरी गुलामगिरी करणे, हे मला शिकवले नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला नाव न घेता लगावला.
आमच्याकडे दोन व्यक्ती भेटल्यानंतर राम-राम म्हणतात. तुमच्याकडे जय श्रीराम म्हणतात. शेवटी राम आहेच. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामललाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, अशी आठवण त्यांनी सांगितली.
भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही
भाजपा-शिवसेना युतीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही युती तोडली, कारण २०१४ मध्ये त्यांनी आधी युती तोडली. तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आजही आम्ही हिंदू आहोत आणि उद्याही राहू. आम्ही फक्त त्यांची साथ सोडली आहे. आम्ही हिंदुत्व सोडले नाही. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. ते जे आज हिंदुत्व चालवत आहेत, ते मी मानायला तयार नाही. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खिल्ली उडवत ते म्हणाले, आम्ही आज तुमच्या येथे आलो, तिथे कुरियरने पार्सल पाठवले.