किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.77° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना उत्तर,
मुंबई, (१२ फेब्रुवारी ) – कोण, कसे आहे, हे जनतेला चांगले ठावूक आहे. जनाब बाळासाहेब ठाकरे असे कॅलेंडर कोणी छापले होते, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तत्पूर्वी, आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात, भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले नाही, असे म्हटले होते. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामललाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, असे विधान केले होते.
त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे, आता उद्धव ठाकरेंना जैन समाजाची, उत्तर भारतीयांची आठवण येतेय्. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण नाही, हे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असे नाव लिहून उर्दूत कॅलेंडर छापले होते, हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व निवडणुका एकत्र घेऊन दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की, उद्धव सध्या सर्व पक्षांचे नेते झाले आहेत. त्यांनी वन नेशन वन इलेक्शन या नार्याला साथ द्यावी, एवढेच आमचे म्हणणे आहे.
कोश्यारींचे केले कौतुक
यावेळी फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे तोंडभरून कौतुक केले. कोश्यारींनी महाराष्ट्रात उत्तम कार्य केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले होते, परंतु मविआ नेत्यांचा त्यांच्यावर राग होता. हा अध्याय आता संपला आहे. कोश्यारींनी महाराष्ट्राची सेवा केली, त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.