किमान तापमान : 27.31° से.
कमाल तापमान : 27.95° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.31° से.
26.99°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट,
मुंबई, (१३ फेब्रुवारी ) – माझ्या आणि अजित पवार यांच्या २०१९ मधील पहाटेच्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला. २०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. यासंदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी आमच्यासोबत विश्वासघात करण्यात आला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला, असे फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे आमच्यासोबत निवडणुका लढले आणि निवडून आले. प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट केले तेव्हा उद्धव ठाकरे टाळ्या वाजवत होते. मात्र, आपल्याला मुख्यमंत्री होता येईल, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चा केली नाही. मुख्यमंत्रिपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राकाँ आणि काँग्रेससोबत निघून गेले, अशी आठवण त्यांनी करून दिली.
आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रस्ताव आला की, आम्हाला स्थिर सरकार हवे आहे. म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते, तेव्हा चेहरा पाहात बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय घेतला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. यावर चर्चा शरद पवारोशी झाली होती. सर्व गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे सर्वांनी पाहिले, असेही फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर, प्रामाणिक भावनेतून घेतली होती, पण नंतर ते कसे तोंडघशी पडले, हे अजित पवार सांगतील. त्यांनी नाही सांगितले तर मी सांगेन, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
मला देवेंद्र सभ्य वाटले होते : शरद पवार
अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मला वाटले देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचे वक्तव्य करतील, असे मला कधी वाटले नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.