किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१४ फेब्रुवारी ) – महाराष्ट्रात संजय राऊत यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही. आदित्य ठाकरे निवडणुका घेण्याच्या वल्गना करतात. मात्र, त्यांना भाजपाचा लहानसा कार्यकर्ता देखील हरवू शकतो. त्यासाठी मला येण्याची गरज नाही. जे आपला पक्ष सांभाळू शकले नाही, त्यांच्याविषयी काय बोलायचे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चेंबूर येथील पत्रपरिषदेत निशाणा साधला.
जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अनुराग ठाकूर मुंबईत आले होते. यावेळी ते म्हणाले, भाजपाने नेहमी युतीचा धर्म पाळला आहे. संघटन मजबूत करण्यावरही भर दिला. पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. सत्ता आमच्यासाठी सेवेचे माध्यम आहे. देशाला तोडण्याचे काम करणार्यांविरोधात कारवाई केली आहे.
मोदी सरकारने यंदा अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केला. समाजातील सर्वच घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी २०१४ च्या तुलनेत नऊपट बजेट वाढले. काँग्रेस सरकारच्या काळात १ हजार १७१ कोटी महाराष्ट्राला मिळत होते. आज १३,७०० कोटी रुपयांचा निधी एका वित्तीय वर्षात महाराष्ट्राला देण्यात येणार आहे. कोरोना काळात लघु उद्योगांना मदत करण्यात आली. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुरळीत झाली. भारत जगातील पाचव्या क‘मांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.
शेतकर्यांसाठी वरदान ठरतील अशा योजना येत आहेत. गरिबांना मोफत धान्य पुरवण्याचे काम मोदी सरकारने केले. रस्ते विकासात १,४०३ प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर झाले. मेट्रोला भरघोस निधी आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला मिळाल्या. महिला आणि युवकांच्या आर्थिक सक्षमकरणासाठी निधीची तरतूद केली आहे. एकूणच सर्वच घटकांच्या विकासाचा विचार मोदी सरकारने केला असल्याचे ठाकूर म्हणाले.