किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१४ फेब्रुवारी ) – नवाब मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी हवी असल्यास ते खरच आजारी आहेत, हे आधी आम्हाला पटवून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. असे न झाल्यास, तुम्हाला वाट पाहावी लागेल; कारण तुमच्या आधी आलेली बरीच प्रकरण प्रलंबित आहेत, अशी भूमिका न्या. मकरंद कर्णिक यांनी मंगळवारी विशद केली.
नवाब मलिकांच्या जामीन अर्जाला ईडीतर्फे सहायक महाधिवक्ता अनिलसिंह यांनी जोरदार विरोध केला. मलिक हे पीएमएलए कायद्यातील कलम ४५ मधील तरतुदीनुसार आजारी नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. यावर हायकोर्टाने नवाब मलिकांच्या जामिनावरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करीत २१ फेब्रुवारीच्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांना केवळ मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तिवाद करण्याचा आदेश दिला.
नवाब मलिकांची एक किडनी निकामी झाली आणि ते सध्या एकाच किडनीवर आहेत. मात्र, ईडी त्यांच्या रुग्णालयातील डिस्चार्जसाठी घाई करीत आहे, असा दावा त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. नवाब मलिक हे गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल आहेत. किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत, अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. न्यायमूर्ती कर्णिक यांनी अनिल देशमुखांना याच धर्तीवर जामीन दिल्याचा दाखला त्यांनी दिला.