किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.8° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.8° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशशिंदे-फडणवीस सरकारची शेतकर्यांना आनंददायी भेट,
मुंबई, (१४ फेब्रुवारी ) – राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टर १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी एक हजार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकर्यांना होणार आहे. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकर्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.
२०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धानाची खरेदी झाली होती. मात्र, या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. या पूर्वीच्या खरीप हंमागात धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली. तथापि, ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. ज्या शेतकर्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे, अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्रीकरिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतकर्यांनी नोंदणी केली असून, एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.