किमान तापमान : 28.93° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय,
मुंबई, (१५ फेब्रुवारी ) – पीएम श्री योजनेंतर्गत राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळांचा उच्च दर्जाचे शिक्षण देणार्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकास करण्यात येणार असून, यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येणार आहे.
पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे. यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राज्यात लागू करण्यात येईल. पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येईल. या शाळांसाठी ५ वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून, राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसर्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाणार आहे.
विकासासाठी सहा आधारस्तंभ
या शाळांचा विकास प्रामुख्याने सहा प्रमुख आधारस्तंभांवर केला जाईल. यात अभ्यासक्रम, आध्यापन शास्त्र व मूल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती आणि लैंगिक समाधान, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन, लाभार्थी समाधान यांचा समावेश आहे.