किमान तापमान : 28.48° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– फडणवीसांनंतर आता सदाभाऊ खोत यांचाही आरोप,
मुंबई, (१५ फेब्रुवारी ) – २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. देशभरात या शपथविधी सोहळ्याची चर्चा होती. मात्र, हे सरकार काही तासांतच कोसळले. या शपथविधीबाबत नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. या शपथविधीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती, किंबहुना त्यांच्या संमतीनेच सगळे झाले होते, असे फडणवीस म्हणाले होते. आता यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव असल्याचा आरोप केला आहे.
सदाभाऊ खोत यांनी शेतराखणीचे उदाहरण देत पवारांना टोला लगावला. खोत म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीबाबत यापूर्वी मी माझी स्पष्ट भूमिका मांडली होती. माझी भूमिका अशी होती की, शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधी होऊच शकत नाही. अजित पवार स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शरद पवारांना शपथविधीबाबत माहिती नाही, हे म्हणणे खोटे आहे.
शेतराखणीचे उदाहरण आणि पवारांना टोला
कसं असतं, ज्यावेळी शेतात पीक येते आणि पीक आल्यानंतर तिथे राखण्या बसवला जातो. राखण्या बसवला की तो पाखरांना येऊ देत नाही. त्यामुळे पाखरांना प्रश्न पडतो की, आता बाबा दाणे खायचे कसे, पाखरं हुशार असतात, ती एक-दोन दिवस शेताकडे येतच नाहीत. मग राखण्याला वाटते की, आता पाखरं यायची बंद झाली. त्यामुळे तो झोपून जातो. मग अचानक पाखरं येऊन दाणे खाऊन जातात. त्याचप्रमाणे राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर पवारांना कळले, आता आपल्याला थोडं शांत राहावे लागेल आणि काहीतरी युक्ती करावी लागेल. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाल्यांना सांगितले की, मी तुमच्याबरोबर सरकार बनवायला येतो, तुम्ही का चिंता करताय्. अजित पवार येतील, उद्या शपथविधी घ्या. त्यानंतर रात्रीच राष्ट्रपती राजवट उठवली, राखण्या गेला आणि बरोबर दुसर्या दिवशी शरद पवार यांनी नेहमी ज्याप्रमाणे वागतात, त्या पद्धतीने वागले आणि शिवसेना, काँग्रेसला घेऊन सरकार बनवले, असे खोत म्हणाले.