किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, १५ नोव्हेंबर – दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर, सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ही घोषणा केली. कोरोनारूपी नरकासुराने धुमाकूळ घातला असल्याने मंदिरात जाताना मुखाच्छादनाचा वापर करावा व भौतिक दूरतेच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. मार्चपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती, ती उघडण्यासाठी भाजपासह विविध संघटनांनी आंदोलन करून, सरकारवर दबाव वाढविला होता.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी देव आपल्यातच होते. डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचार्यांच्या रूपाने देव पांढर्या कपड्यांत भक्तांची काळजी घेत होता. आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम व शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व सगळ्यांचे रक्षण करा.
दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे कौतुक केले.
रंगले होते राजकारण
टाळेबंदीच्या काळात मंदिरे उघडण्यावरून राजकारण रंगले होते. मद्यालये, हॉटेल्स उघडण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर टीकेचा भडिमार करून भाजपाने राज्यभरात आंदोलने केली. वंचित बहुजन आघाडीनेही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पंढरपूर येथे आंदोलन करून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे एमआयएमनेही धार्मिक स्थळे उघडण्याची वारंवार मागणी केली होती.
राज्यपाल-मुख्यमंत्र्यांत शाब्दिक युद्ध
मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले होते. मंदिरे बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का, की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता, तो शब्द तुम्ही स्वीकारला आहे, अशी खोचक टीका राज्यपालांनी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले होते. त्यामुळे शाब्दिक युद्ध होते.
उशिरा सुचलेले शहाणपण
मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले. मात्र, हे आघाडी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असा टोलाही लगावला. मंदिराच्या मुद्यांवरून महाआघाडी सरकार मोठ्या प्रमाणात लक्ष्य झाले होते. नाईलाजास्तव मंदिराबाबतीत निर्णय लागला, असे ते म्हणाले.