किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलशेगाव, १५ नोव्हेंबर – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या मार्च महिन्यापासून देशातील संपूर्ण देवस्थाने बंद होती. संत नगरी शेगावचे गजानन माउलीचे मंदिरही बंद होते. प्रदीर्घ कालावधीनंतर आता सोमवार, १६ नोव्हेंबरपासून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेगावातील प्रख्यात श्रीगजानन महाराज मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून भाविकांना श्रीगजाननाचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकले नव्हते. अनेक भाविकांनी टाळेबंदीच्या या काळात आपल्या भक्तीत खंड पडू दिला नाही. टाळेबंदीच्याही काळात अनेकांनी संत गजानन महाराजांच्या बंद दरवाजाला व कुलपाला मनोभावे नमस्कार करून आपला भाव जपला होता.
मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने केली गेलीत. पण तरीही शासनाने मंदिरे उघडण्याचे आदेश काढले नाहीत. अखेर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही विशिष्ट अटींसह पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांची कुलपे उघडण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाचे संकट अजून टळले नाही. म्हणून जरी मंदिरे खुली होणार असली तरी भाविकांनी नियमांचे पालन करणे जरूरी आहे. संत गजानन महाराज संस्थानची शिस्त आणि स्वच्छता सार्या भारतात वाखाणली जाते. याची जाण ठेवून भाविकांनी संतनगरीत येताना व दर्शनानंतर जाताना तसेच गावात फिरताना कोणतीही गर्दी, गडबड, गोंधळ करू नये. शांततेत दर्शनासाठी येऊन सुरक्षित परत जावे. यासाठी निर्जंतुकीकरण द्रव्य वापरावे, मुखाच्छादनाचा वापर करावा, भौतिक अंतर पाळणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.