किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?,
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप,
मुंबई, १३ नोव्हेंबर – महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. भाजपा नेते किरीट सोमय्यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबातील जमीन व्यवहारांविषयी मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवारावर जमीन व्यवहाराला घेऊन गंभीर आरोप केले आहे. हे सरकार भूखंडाचे श्रीखंड लाटण्यात गुंतले असल्याची टीका करीत, ४० पैकी ३० जमिनींचे व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सोमय्या म्हणाले की, मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याविषयी बोललो होतो. संजय राऊत ऐकत असतील, तर त्यांनी स्पष्ट ऐकावे. जी जमीन २ कोटी ५५ लाखांमध्ये अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली, ती ९०० कोटींमध्ये विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी यापूर्वीच दिले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना मला सांगायचे आहे की, मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. तुमच्यात उत्तर देण्याची हिंमत नसल्याने तुम्ही शिवीगाळ करता. दहिसर घोटाळ्याचे सर्व कागदपत्रे असून, मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दिली आहे. ती दाखलही करण्यात आली आहे.
ठाकरे कुटुंबाने आतापर्यंत जमिनीचे ४० व्यवहार केले आहेत. त्यापैकी ३० व्यवहार एकट्या अन्वय नाईकांसोबत कसे? यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे काय? असे अनेक प्रश्न सोमय्यांनी विचारलेत. आता उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी याची उत्तरे द्यावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
तीन हजार कोटींची जमीन
दरम्यान, मुलुंड येथे ५ हजार खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्यासाठी तीन हजार कोटी किंमतीची जमीन खरेदी करण्याच्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या निर्णयाची लोकायुक्तांनी चौकशी करावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले असल्याची माहिती सोमया यांनी दिली. या बाबत सोमय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी ही तक्रार, याचिका लोकायुक्तांकडे पाठविली आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.