किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, (०३ डिसेंबर) – तीन राज्यांतील पराभवाचे काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला दिला.
तीन राज्यांतील निकाल धक्का देणारे आहे. काँग्रेसकडून काही कमतरता झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची बाजी अचानक कशी पलटली, याचा अभ्यास केला पाहिजे. तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. २०१८ मध्ये काँग्रेसचा तीन राज्यांमध्ये विजय झाला होता. परंतु, २०२४ मध्ये आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडण्यात आले. कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना गद्दारी करून घरी बसवण्यात आले. हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपाने कोणाचा चेहरा दिलेला नव्हता. निवडणुकांची सर्व तयारी दिल्लीतून केल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील सगळा कारभार हा गुजरातला चालला आहे. जनतेला कोर्ट, निवडणूक आयोगकडून अपेक्षा आहेत. गद्दारी झाली आहे, या निवडणुकीत रणनीती ही केंद्रीय नेतृत्वाने बनवली, असेही प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.