किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया,
नागपूर, (०३ डिसेंबर) – तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले असून हे यश जनतेचा मोदींवरील विश्वास, या विश्वासाचे यश आहे. ज्या प्रकारे मोदीजींंनी पारदर्शी व प्रामाणिकपणे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्याप्रकारे मोदीजींनी देशाला विकासाचा मार्गावर नेलं, ज्या प्रकारे मोदीजींनी सामान्य माणसाच्या मनात ‘सरकार जनतेसाठी काम करते आहे’, हे बिंबवले, त्याचे प्रत्यंतर लोकांना पहायला मिळाले, त्याचा हा विजय आहे. सर्व राज्यांमधील जनतेचे आभार मानतोच. खर्या अर्थाने विजयाचे श्रेय मोदीजींचे आहे. मोदीजींच्या नावाचं, त्यांच्या करिष्म्याचे आहे. त्याचसोबत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, आमचे ‘मास्टर स्ट्रॅडेजिस्ट’ अमितभाई शहा यांच्यासोबत, त्या-त्या राज्यातील भाजपची चमू, राष्ट्रीय चमू या सगळ्यांचे हे श्रेय आहे.
भाजपची मते ही १० टक्केंपेक्षाही जास्त वाढलेली आहेत. विशेषतः छत्तीसगडमध्ये सुमारे १४ टक्के वाढली, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात, मध्य प्रदेशात ८ टक्केंनी वाढलेली आहेत. तेलंगाणामध्ये १० टक्केंनी मते वाढलेली आहेत. एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास भाजपवर पहायला मिळतो आहे. ६३९ पैकी ३३९ जागा भाजप जिंकतेय. ५० टक्केंपेक्षा जास्त जागा या भाजपला मिळताहेत. अभूतपूर्व निकाल आहे. हा निकाल एकप्रकारे जनतेच्या मनात काय आहे, याची नांदी आहे. लोकसभेत अभूतपूर्व विजय भाजपला मिळणार आहे, त्याची ही नांदी आहे. जी इंडि आघाडी तयार झाली होती तिला लोकांनी नाकारले आहे.
राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता, त्यालाही लोकांनी नाकारले आहे. लोकांच्या मनात केवळ मोदीजी आहेत. याचे खापर पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडले जाईल. त्यांनी कुणावरही खापर फोडले तरी जनता मोदीजीच्या पाठिशी आहे. महाराष्ट्रातही हिच परिस्थिती आहे. नुुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २ तृतियांश ग्रामपंचायती महायुतीने जिंकल्या. लोकसभेत तेच पहायला मिळणार आहे, असे देंवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
तीन राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांचा कल सकाळी भाजपच्या बाजूने येताच भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्येआनंदाची लाट उसळली. धंतोलीमधील भाजपाच्या विभागीय कार्यालयासमोर दुपारी भाजपचे कार्यकर्ते गोळा झाले. काहींच्या हातात भगवे झेंडे तर काहींच्या हातात भाजपचे झेंडे होते. जय श्रीराम, भारत माता की जय आदी घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. आ. बावनकुळे यांनीसुद्धा ढोल वाजवला. आनंदाने गुलाल उधळत पुरुष व महिला कार्यकर्ते ढोलच्या तालावर बेधुंद नाचले. कुणी आतषबाजी केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंटी कुकडे यांना पेढा भरवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृतस्तंभाचा होणारा शाश्वत विकास म्हणजे आजचा विजय आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शहराध्यक्ष बंटी कुकडे म्हणाले की, भाजपच्या विकासाचा अजेंडा आणि समाजातील शेवटच्या मागासलेल्या व्यक्तीसाठी फायदेशीर असलेल्या योजनांना पाठींबा देत तीन राज्यातील जनतेने पंतप्रधानांच्या विरोधात विरोधकांनी केलेल्या खालच्या पातळीवरील वैयक्तिक वक्तव्याला मतांच्या माध्यमातून प्रतिसाद दिला. राज्याचे प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी सांगितले की, सबका साथ सबका विकास, जनहिताच्या विकास योजनांची अंमलबजावणी, मोदी हमी, महिला सुरक्षा, प्रत्येक हाताला काम, या सोबतच निवडणुकीत सूक्ष्म नियोजन करून भाजपच्या संघटनेने हा विजय मिळवला, त्याचाच परिणाम आहे. याचा अर्थ तिन्ही राज्यातील जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त केला.
आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, गिरीश व्यास, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धरमपाल मेश्राम, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, अश्विनी जिचकार, गुड्डू त्रिवेदी, विष्णू चांगदे, संजय बंगाले, किर्तीदा अजमेरा, मनीषा काशीकर, प्रीती राजदेरकर, श्रद्धा पाठक, विमलकुमार श्रीवास्तव, भोजराज डुंबे, अजय पाठक, सुबोध आचार्य, सतीश सिरसवान, बाल्या बोरकर, चेतना टांक, युवा मोर्चाचे अध्यक्ष बादल राऊत, गुड्डू पांडे, सुनील सूर्यवंशी, अस्लम खान यांच्यासह शेकडो अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.